शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

‘नेचर्स बोट क्लब’ला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:15 AM

नाशिक : कोट्यवधी रु पये खर्च करून गंगापूर धरणालगत साकारलेल्या नाशिककरांच्या ‘नेचर्स बोट क्लब’ला अखेर मुहूर्त लाभणार आहे. जलसंपदा खात्याकडून पर्यटन विकास महामंडळाकडे हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात आल्यानंतर महामंडळाने याबाबत हालचाली करत या आठवड्यामध्ये प्रधान कार्यालयाद्वारे ‘बोट क्लब’ची खुली निविदा प्रसिद्ध होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू ...

नाशिक : कोट्यवधी रु पये खर्च करून गंगापूर धरणालगत साकारलेल्या नाशिककरांच्या ‘नेचर्स बोट क्लब’ला अखेर मुहूर्त लाभणार आहे. जलसंपदा खात्याकडून पर्यटन विकास महामंडळाकडे हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात आल्यानंतर महामंडळाने याबाबत हालचाली करत या आठवड्यामध्ये प्रधान कार्यालयाद्वारे ‘बोट क्लब’ची खुली निविदा प्रसिद्ध होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्याचे समजते.नाशिकच्या पर्यटनक्षेत्राला चालना मिळावी, या दृष्टीने २०१४ साली तत्कालीन पर्यटन व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन बोट क्लबची मुहूर्तमेढ रोवली. बोट क्लबच अस्तित्वात येऊन चार वर्षांचा कालावधी लोटला; मात्र या प्रकल्पाचे लोकार्पण होऊ शकले नाही. जलसंपदा विभागाने आठ कोटी ४७ लाख रुपये खर्च करून विविध प्रकारच्या अत्याधुनिक अशा ४७ बोटी खरेदी केल्या. या सर्व बोटी मागील अनेक महिन्यांपासून प्रकल्पाच्या वास्तूमध्ये पाणकापडाने झाकून ठेवण्यात आल्या आहेत. प्रकल्पाला लागलेले ग्रहण सुटण्याची चिन्हे असून, बोट क्लब नाशिककरांच्या सेवेत लवकरात लवकर यावे, यासाठी प्रादेशिक कार्यालयाकडून सातत्याने प्रधान कार्यालयाकडे प्रयत्न सुरू आहे, असे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांनी सांगितले. गंगापूर धरण परिसर पर्यटकांचा नेहमीच पसंतीचा राहिला आहे. यामुळे या भागात पर्यटकांची वर्दळ पहावयास मिळते. जवळच वायनरी, द्राक्ष मळे, निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे पर्यटक या भागात आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळे नाशिकच्या पर्यटनाच्या दृष्टीने येथे धरण पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘नेचर्स बोट क्लब’ मैलाचा दगड ठरणार आहे. पॅरासेलिंग, जेट स्कीस्, बनाना, पॅडल बोटींचा या क्लबमध्ये समावेश असून २५ साध्या बोटी, तर २२ इंजिन असलेल्या मोटर बोटी आहेत. जेट स्कीस् एकूण दहा आहेत, तर पॅरासेलिंग दोन असल्याची माहिती स्थापत्त अभियंता महेश बागुल यांनी दिली. या बोटी अत्याधुनिक असून, पर्यावरण व पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित आहेत. बोटींद्वारे जलप्रदूषणाला निमंत्रण मिळणार नसल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.जलसंपदा विभागाची ‘लक्ष्मणरेषा’ बोट क्लब पर्यटन विकास महामंडळामार्फत निविदा प्रसिद्ध करून सुरू करण्यात आले तरी त्या क्लबमधील सर्व बोटी ज्या गंगापूर धरणात धावणार आहेत. त्यांच्यापुढे जलसंपदा खात्याची ‘लक्ष्मणरेषा’ राहणार आहे. जलसंपदा विभागाने आखून दिलेल्या सीमारेषेच्या आतमध्येच बोटी चालविण्याची परवानगी संबंधित निविदा भरणाºया ठेकेदाराला मिळणार आहे.