साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील कोकणवाडा शिवारात दोन दिवसांपूर्वी शेळ्या चारणाºया दोन मैत्रिणींचा विहीरीत पडल्याने जीव जाणार होता, परंतु फक्त वाचवा - वाचवा असा आवाज ऐकुन एकनाथने नाथ बनून विहीरीत उडी घेवून दोन्ही मैत्रिणींना वाचविल्याने ‘देव त्यारी त्याला कारेण मारी’ हि म्हण या घटनेमुळे प्रत्यक्ष अनुभवली.याबाबतचे वृत्त असे की, दोन दिवसांपूर्वी साकोरा ते डॉक्टरवाडी रस्त्यावरील कोकणवाडा अदिवासी शिवारात शाळेत जाणाºया भारती चौधरी (९), व लता पवार (९) या दोन्ही मैत्रिणी शेळ्या चारण्यासाठी गेल्या असता अचानक भारतीला तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी ती एका विहीरीत उतरली होती. तीच्या पाठोपाठ लता देखील विहीरीत उतरली परंतु काही क्षणात भारतीचा पाय घसरल्याने ती पाण्यात बुडू लागली हे पाहून लताने तीचा हात धरून खेचण्याचा प्रयत्न केला, परंतू लता देखील पाण्यात पडल्याने वाचवा म्हणून जोरात आवाज देवू लागल्या परिसरात शांतता असल्याने काही अंतरावर असणाºया इयत्ता सातवीत शिकणाºया एकनाथ वळवी (१२) या विद्यार्थ्याला ऐकु आल्याने तो पटकन विहीरीजवळ आला आणि त्याने मुली बुडतांना पाहिल्यावर क्षणाचाही विलंब न करता विहीरीत कपड्यासह ऊडी घेवून प्रथम खोल पाण्यात बुडणाºया भारतीला कडेला आणून लगेच लताला देखील वर काढले. त्याच्या या धाडसपणाचे सर्वत्र कौतुक केले जात असून कोकणवाडा येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वेताळ व शिक्षक उमेश बोरसे यांनी त्याचा गौरव केला.
संकटात नाथ आला धावून...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 5:29 PM
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील कोकणवाडा शिवारात दोन दिवसांपूर्वी शेळ्या चारणाºया दोन मैत्रिणींचा विहीरीत पडल्याने जीव जाणार होता, परंतु फक्त वाचवा - वाचवा असा आवाज ऐकुन एकनाथने नाथ बनून विहीरीत उडी घेवून दोन्ही मैत्रिणींना वाचविल्याने ‘देव त्यारी त्याला कारेण मारी’ हि म्हण या घटनेमुळे प्रत्यक्ष अनुभवली.
ठळक मुद्देविहीरीत बुडणाऱ्या दोन मैत्रिणींचे वाचवले प्राण