शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

पळसे टोल नाक्यावर राष्टÑवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 1:40 AM

पळसे गावातील विविध समस्यांबाबत सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चेतक कंपनी प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले.

नाशिकरोड : पळसे गावातील विविध समस्यांबाबत सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चेतक कंपनी प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले.पळसे परिसरात विविध अपघातांत सात नागरिकांचा बळी गेला आहे. झेब्रा क्रॉसिंगवर गतिरोधक तसेच हायमास्ट बसविण्यात यावे, बंगालीबाबा ते पळसे पूलदरम्यान अर्धवट बसविलेले पथदीपाचे काम पूर्ण करावे, पळसे गावाजवळील अमरधाम रस्त्याकडे जाणाऱ्या अर्धवट सर्व्हिसरोडचे काम पूर्ण तयार करावे आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक तालुका अध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी अकरा वाजता शिंदे टोल नाका येथे चेतक कंपनीचे व्यवस्थापक विठ्ठल पाटील यांना घेराव घातला.यावेळी टोल नाका प्रशासन अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. व्यवस्थापक पाटील यांना धारेवर धरत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलनामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस नाशिक तालुका अध्यक्ष संदेश टिळे, राजाभाऊ जाधव, निखिल भागवत, कैलास कळमकर, अविनाश टिळे, मोहन टिळे, गणेश टिळे, कुमार गायधनी, विकी जाधव, प्रशांत राजगुरू, सोनू वाईकर, मदन गोडसे, प्रशांत काळे, नामदेव शिंदे, श्रीकांत टावरे आदी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसtollplazaटोलनाका