शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

नाशिकच्या संरक्षणाला केंद्रीय सुरक्षा बलाचे ‘कडे’ ओढ्याला नवी प्रशिक्षण अकादमी : ६७ एकर जागेवर साकारणार प्रकल्प; १२५० सशस्त्र जवान राहणार तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 1:05 AM

नाशिक : देशपातळीवर अतिरेक्यांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पेलण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने महाराष्टÑातील नाशिक व मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी दोन सुरक्षा तळे उभारण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देऔद्योगिक सुरक्षा दलाच्या तळाचे काम लष्कराप्रमाणे या दलाचा उपयोग

नाशिक : देशपातळीवर अतिरेक्यांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पेलण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने महाराष्टÑातील नाशिक व मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी दोन सुरक्षा तळे उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी केल्या जाणाºया जागेचा शोधही संपुष्टात आला आहे. नाशिकपासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर असलेल्या ओढा-सय्यदपिंप्री या दोन्ही गावांच्या सीमेवर सुमारे ६७ एकर जागेवर लवकरच औद्योगिक सुरक्षा दलाच्या तळाचे काम केले जाणार आहे.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नाशिक येथे तळ करण्यामागे अनेक कारणे देण्यात आली असून, त्यात प्रामुख्याने ओझर व आर्टिलरी सेंटरच्या गांधीनगर या दोन्ही विमानतळाच्या सुरक्षेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. याशिवाय नाशिकरोडच्या करन्सी नोट प्रेस, मध्यवर्ती कारागृह, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र, रेल्वेस्थानकाच्याही सुरक्षेचा आढावा मध्यंतरी घेण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने ते संवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिकमधील सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांबरोबरच लगतच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यांत उद्भवलेल्या आपद्स्थितीचा सामना करण्यासाठीही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कामी येणार आहे.नैसर्गिक आपत्तीचा सामना, पूरस्थितीत बचाव व मदतकार्यासाठीही लष्कराप्रमाणे या दलाचा उपयोग करून घेण्यात येणार आहे. नाशिकपासून जवळच त्यासाठी जागेची निश्चिती करण्यात आली असून, ओढा-सय्यदपिंप्री या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सीमेवर सुमारे ६७ एकर जागा ताब्यात घेण्यासाठी ३२ कोटी रुपयांचे शासकीय मूल्यही भरण्यात आले आहे. मध्यंतरी औद्योगिक सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या जागेची पाहणी करून आपली पसंतीही प्रशासनाला कळविली आहे. या जागेवर संपूर्ण बटालियनच्या निवासाची, ट्रेनिंगची सुविधा उभारण्यात येणार असून, राज्यात कोठेही गरज पडल्यास या दलाची सहाय्यता घेण्यात येणार आहे.एकाचवेळी १२५० सशस्त्र जवानांची आवश्यकता भासेल त्याठिकाणी रवानगी करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले.विमानतळ, आर्टिलरीची होणार सुरक्षाकेंद्रीय गृहमंत्रालयाने काही महिन्यांपूर्वीच देशातील महत्त्वाच्या शहरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने साधारणत: १२५० सशस्त्र जवानांचा समावेश असलेल्या दोन बटालियन कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी नाशिक व भोपाळ या दोन शहरांची निवड केली आहे.या सुरक्षा दलाचा उपयोग विमानतळ, सागरी पोर्ट, शासकीय महत्त्वाच्या इमारती, आर्टिलरी सेंटर, पुरातत्व खात्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेसाठी करण्याबरोबरच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौºयाच्या सुरक्षेची जबाबदारीही देण्यात येणार असल्याचे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले.