ठळक मुद्देव्याख्यानांच्या माध्यमातून तंबाखू मुक्तीबाबत प्रबोधन
दिंडोरी : तंबाखूमुक्त अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नरोत्तम शेख सारिया फाउंडेशन मुंबई यांच्यामार्फत दारूबंदी व व्यसनमुक्ती चळवळीत काम करणाऱ्या लखमापूरच्या (ता. दिंडोरी) माजी सरपंच ज्योती देशमुख यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.ज्योती देशमुख त्यांनी गेल्यावर्षी विविध शाळा महाविद्यालयात तंबाखू व त्याचे दुष्परिणाम यावर व्याख्यानांच्या माध्यमातून तंबाखू मुक्तीबाबत प्रबोधन केले होते. त्यांच्या या कार्याची दखल नरोत्तम शेख सारिया फाउंडेशनने घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.(फोटो २२ ज्योती देशमुख)