शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव होण्यासाठी चळवळ सिन्नर तहसीलमध्ये राष्टÑीय ग्राहक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:50 PM

सिन्नर : ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव होण्यासाठी ग्राहक चळवळ जोमाने पुढे नेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.

ठळक मुद्देकायद्याची माहिती करून घेण्याचे आवाहनफसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे दाद

सिन्नर : ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव होण्यासाठी ग्राहक चळवळ जोमाने पुढे नेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. सिन्नर तहसीलदार कार्यालय, ग्राहक पंचायत व लायन्स क्लब सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आमदार वाजे बोलत होते.व्यासपीठावर तहसीलदार नितीन गवळी, ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक दत्ता शेळके, मविप्र चे संचालक हेमंत वाजे, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय गडाख, नगराध्यक्ष किरण डगळे, नायब तहसीलदार प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक ग्राहकाने जागरूक राहून वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. ग्राहकांने ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती करून घेण्याचे आवाहन तहसीलदार नितीन गवळी यांनी केले. ग्राहक संघटनेचे जिल्हा संघटक दत्ता शेळके यांनी स्व. बिंदुमाधव जोशी यांनी स्थापन केलेल्या ग्राहक पंचायतीची पार्श्वभूमी सांगून ग्राहकांनी खरेदी करताना वस्तू खरेदी केल्याची पक्की पावती घ्यावी, जेणेकरून फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे दाद मागता येईल, असे सांगितले. ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक विश्वनाथ शिरोळे यांनी जागरूक ग्राहक कसा असावा याबद्दल माहिती देऊन ग्राहकांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली तसेच ग्राहक चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी डॉ. श्यामसुंदर झळके यांनी ग्राहक संरक्षण कायद्याची पार्श्वभूमी विशद करून त्याचा सर्वांनी अभ्यास करून आपली जबाबदारी, कर्तव्य व हक्काचे जतन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. फसव्या जाहिरातींमुळे ग्राहक कसे बळी पडतात हे विनोदी शैलीत सांगितले. नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांनी मार्गदर्शन करून मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी डॉ. विष्णू अत्रे, प्रशांत गाडे, नगरसेवक विजय जाधव, शैलेश नाईक, पुरवठा निरीक्षक अशोक लोखंडे, प्रज्ञा हिरे, भरती भुसारे, शरद आढाव, शशिकांत आढाव, मुरलीधर चौरे, उत्तम कडलग, पंढरीनाथ शेळके उपस्थित होते.