सिन्नर : तालुक्यातील चिंचोली येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर विश्वेश्वरय्या इंन्स्टिट्युट आॅफ टेक्नोलॉजी महाविद्यालयात संगणक विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अॅडवान्सड कॉम्प्युटिंग अॅण्ड डेटा प्रोसेसिंग’ या विषयावर राष्टÑीय परिषद पार पडली.राष्टÑीय परिषदेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. यात परिषदेत माहिती तंत्रज्ञानातील चालू घडामोडी या विषयावर विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीओएस कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या अध्यक्ष डॉ. वर्षा पाटील होत्या. यावेळी इएसडीएसचे मुख्या टेक्नॉलॉजी आफिसर अशोक पोमनार, स्कॉलर टेक्नीकल युनिव्हर्सिटी आॅफ सोफिया युरोपचे रिसर्चस संतोष जाधव यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात बेस्ट पेपर पारितोषिक नम्रता कपिले व नाशिक येथील एस. व्ही. आय. टी. ग्रुप, बेस्ट प्रझेंटेशन पारितोषिक ऋषिकेश सातपुते आणि संगमनेर येथील ग्रुप आॅफ अमृतवाहिनी महाविद्यालय, बेस्ट इनोवोटीव्ह आयडिया पारितोषिक प्रणिता शिरसाठ व नाशिक येथील एस. व्ही. आय. टी. ग्रुप यांना मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ. के. टी. व्ही. रेड्डी व प्रा. किशोर शेंडगे यांनी दिली. या परिषद यशस्वीतेसाठी संगणक विभागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
चिंचोली महाविद्यालयात राष्टÑीय परिषद उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 5:39 PM