नाशिक : शेतकऱ्यांचा कांदा व अन्य शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील शेतक-यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांद्यासह शेतमालाला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी सोमवारी सकाळी १० वाजता मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उमराणे येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी दिली आहे.कांद्याचे भाव वाढल्यावर भाव खाली येऊन स्थिर रहावे यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. त्याच प्रमाणे आज रोजी कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. शेतक-यांचे उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतक-यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी पगार यांनी केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमवार १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग अडविण्यात येणार आहे. महामार्गावरील उमराणे, ता.देवळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
राष्टÑवादी करणार हमीभावासाठी रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 2:23 PM
कांद्याचे भाव वाढल्यावर भाव खाली येऊन स्थिर रहावे यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. त्याच प्रमाणे आज रोजी कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. शेतक-यांचे उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे.
ठळक मुद्दे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उमराणे येथे रास्ता रोको करण्यात येणार कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले; उत्पादन शुल्क देखील वसूल होत नाही