त्र्यंबकेश्वर : श्री नित्यानंद आश्रमाचे नर्मदानंद महाराज यांची राष्टÑीय धर्म विजययात्रा येथे उत्साहात दाखल झाली. या यात्रेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तथा पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी स्वागत केले. नित्यानंद आश्रमातील संत नर्मदानंदजी महाराज यांची आसेतु हिमालय द्वादश ज्योतिर्लिंगात तीथर्यात्रा घेण्याचे वचन दिले आहे. त्यांची राष्टÑीय धर्म विजययात्रा दि. २९ सप्टेंबर रोजी गंगोत्री धाम येथून सुरू होईल. राष्टÑीय धर्म विजययात्रा केदारनाथ धामला त्याच दिवशी गंगा मय्याचे पवित्र जल घेऊन रवाना होईल. केदारनाथ ते काशी विश्वनाथ, बैजनाथ महादेव, रामेश्वरम, श्री शैलम, भीमाशंकर, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, सोमनाथ महादेव, नागेश्वर, उज्जैन अशी ही यात्रा ओंकेश्वर येथे संपेल. देशाच्या सर्व ज्योतिर्लिंगांवर संपूर्ण राष्टÑीय महायज्ञ आणि दोनदा नर्मदा परिक्रमा पूज्य गुरुदेव श्री श्री १००८ श्री नर्मदानंद जी महाराज राष्टÑीय धर्म विजययात्रेमध्ये दररोज रात्री विश्रांतीच्या ठिकाणी राष्टÑ, धर्म आणि गौमातांच्या रक्षणासाठी सर्व भारतभर पायी रथयात्रेने फिरत आहेत. जनजागृती करतात. राष्टÑीय धर्म विजययात्रेची ही अभिनव मोहीम देशातील राज्यांसाठी हजारो खेड्यांमध्ये आकार घेईल. पूज्य गुरुदेव यांची राष्टÑीय विजय धर्मयात्रा १२ महिन्यांच्या कालावधीत बारा हजार किमी अंतरावर आहे. यावेळी उदय थेटे, बजरंग दल प्रमुख चेतन ढेरगे, जिल्हाध्यक्ष हेमंत निखाडे, सचिन धोंडगे, नीलिमा धारणे, देवयानी निखाडे, लक्ष्मीकांत थेटे उपस्थित होते.------त्र्यंबकेश्वर येधे धर्म विजययात्रेच्या स्वागतप्रसंगी पुरुषोत्तम लोहगावकर, प्रशांत गायधी, नर्मदानंद महाराज, प्रणव धोंडगे, बाळासाहेब आसखेडकर, संध्या पवार, अंजली निखाडे आदी.(१२टीबीके२)