नाशिक : राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी काढण्यात येणाºया लॉँग मार्चसाठी हजारो कर्मचारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. शुक्रवारी सकाळी हा लॉँग मार्च मुंबईच्या दिशेने निघणार होता. मात्र, कर्मचाºयांचे प्रतिनिधी तातडीने मुंबईत मुख्यमंत्री आणि सचिवांशी चर्चा करण्यासाठी रवाना झाल्याने रात्री उशिरा सदर प्रतिनिधी परतल्यानंतर आंदोलनाची दिशा ठरणार आहे. राष्टÑीय आरोग्य अभियानच्या माध्यमातून सन २०१७ पासून राज्यातील असंख्य कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कामकाज करीत आहेत. या कर्मचाºयांना अद्यापही सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. या मागणीसाठी गेल्या ८ मेपासून आंदोलन सुरू असून, मागण्यांसाठी नाशिकमधून लॉँग मार्च काढण्याचे नियोजनदेखील करण्यात आलेले आहे. यासाठी पंचवटीतील संत जनार्दनस्वामी आश्रमात राज्यभरातून सुमारे दहा हजार कर्मचारी नाशिक मुक्कामी दाखल झाले आहेत. राष्टÑीय आरोग्य अभियानात २०१७ पासून कर्मचारी कंत्राटी आहेत. त्यांची प्रमुख मागणी सेवेत सामावून घेण्याची तसेच समान दाम मिळावे, अशा अन्य काही मागण्या आहेत. या मागण्यांबाबत वारंवार चर्चा करूनही शासनाकडून कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आता या कर्मचाºयांनी आंदोलनाची हाक दिली असून, या साठी राज्यभरातील हजारो कर्मचारी नाशिकला एकत्र आले आहेत. मात्र मुख्यमंत्री आणि सचिवांबरोबरच झालेल्या चर्चेनंतर सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री उशिरा प्रतिनिधी परतल्यानंतर आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे समजते.
राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियान : सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन ‘लॉँग मार्च’साठी हजारो कर्मचारी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 1:25 AM
नाशिक : राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी काढण्यात येणाºया लॉँग मार्चसाठी हजारो कर्मचारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
ठळक मुद्देप्रतिनिधी मुख्यमंत्री आणि सचिवांशी चर्चा करण्यासाठी रवाना नाशिकमधून लॉँग मार्च काढण्याचे नियोजन