मनमाड : येथील केआरटी शाळेच्या बाल वैज्ञानिकाची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित स्पर्धेसाठी कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम शाळेच्या मोठ्या गटातून हर्षल देविदास चौधरी याने रोबोट तयार केला. लहान गटातून श्रावणी अमर चव्हाण हिने पिझों इलेक्ट्रिक जनरेशन हा प्रकल्प तयार केला . तसेच आयर्न नंदकिशोर पगार या बाल वैज्ञानिक विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली.
पगार याने सोलर एनर्जीवर चालणारा पोर्टेबल फॅन हा प्रकल्प तयार केला. सोलर पॅनलचा वापर करून सौर ऊर्जेवर चालणारा पोर्टेबल फॅन आकाराने छोटा असल्याने तो हाताळण्यासाठी सोपा असून गरजेनुसार कोठेही ठेवता येतो.हा पंखा सौर ऊर्जेवर चालणारा असल्याने विद्युत ऊर्जेची बचत होते. हा पंखा कोणत्याही प्रकारचे हवा प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण करीत नाही. कारमध्ये देखील तो वापरू शकतो.शिक्षक प्रविण आहेर, संगिता कदम व आर्यनचे वडील नंदकिशोर पगार यांचे आर्यनला मार्गदर्शन लाभले. नांदगाव तालुक्यातून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत स्पर्धेत भाग घेणारी केआरटी एकमेव शाळा होती. प्राचार्य मुकेश मिसर, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, उपप्राचार्य वैभव कुलकर्णी, विश्वस्त धनंजय निंभोरकर आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.