चांदवड - येथील कर्मवीर के.ह.आबड कला, श्रीमान मो.गि. लोढा वाणिज्य व पी.एच.जैन महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाची पुणे विद्यापीठाच्या बी.यू.डी . संयुक्त विद्यमाने गुणवत्ता सुधार योजनेद्वारा राष्ट्रीय स्तरावरील राष्टÑीय चर्चासत्र संपन्न झाले.रसायन, जीवशास्त्र , आणि पदार्थ विज्ञानातील जागतीक संधी या विषयावरील चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्रबंध समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती तर उद्घाटक केंद्रसरकार संरक्षण अधिष्ठाता डॉ.पी.के.खन्ना होते.विभागप्रमुख डॉ. अरविंद पाटील यांनी भुमिका मांडली तर जागतिक स्तरावर रासायनिक, जीवशास्त्रीय व पदार्थ विज्ञानातील नवीन संधी अभ्यासता याव्यात यासाठी चर्चासत्र असल्याचे सांगीतले.प्राचार्य डॉ. जी.एच. जैन यांनी प्रगतीचा आढावा मांडला तर प्रा. डॉ. राकेश संचेती यांनी अतिथीचा परिचय करुन दिला.बीजभाषणात डॉ. खन्ना यांनी टरर्नरी सेमी कंडक्टर नॅनो हायब्रीडस फॉर फोटो कॅटालिसीस या विषयाचे महत्व लक्षात घेता संशोधकांनी या विषयाचा गंभीरपणे अभ्यास करणे गरजेचे आहे. रसायन , जीवशास्त्र , पदार्थविज्ञान आणि अन्य विज्ञान शाखांनी एकत्र येऊन जर संशोधन केलेतर नक्कीच जागतिक स्तरावरील उच्च दर्जाचे तंत्रज्ञान भारत निर्माण करु शकेल.तर अध्यक्ष बेबीलाल संचेती यांनी विज्ञान विभाग अधिक समृध्द होत असून डिएस्टी , फिस्ट मिळाल्याचा प्रचंड अभिमान व आंनद वाटतो. सूत्रसंचालन प्रा. मीनाक्षी तोडरवाल व आभार डॉ.राकेश संचेती यांनी केले.पहिल्या सत्राची सुरुवात कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे डॉ.अनिल घुले यांनी नॅनो तंत्राचा वापर टाकाऊपासून टिकाऊ तंत्रज्ञान तयार करण्यासाठी कसा करता येईल हे सांगीतले तर यावेळी दुसऱ्या सत्रात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या विभागप्रमुख डॉ.रत्नमाला बेंद्रे यांनी नैसर्गिक रासायनिक रेणुंचा औषधनिर्माणशास्त्र आणि पेस्टीसाईड यासारख्या घटकामध्ये प्रभावीपणे कसा करता येईल हे सांगीतले.
चांदवड महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाचे राष्टÑीय चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 5:44 PM