नाशिक : अखिल भारतीय ग्राहक मंचचे २१ आणि २२ एप्रिल असे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात होणार आहे. अधिवेशनात मंचचे देशाभरातील सर्वच राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, त्याचे उद््घाटन केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती सदस्यांची समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी बैठक झाली. त्यामध्ये समितीचे राष्ट्रीय अधिवेशन नाशिकमध्ये घेण्याचा निर्णय झाला. या अधिवेशनासाठी केंद्रीय अन्न पुरवठामंत्री रामविलास पासवान, राज्याचे पुरवठामंत्री गिरीश बापट, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आदींना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी प्रा. दिलीप फडके, औरंगाबादचे प्रांत कार्यकारिणी समिती सदस्य ओमकार जोशी, रवींद्र इंगळीकर, जळगावचे विकास महाजन, राजेंद्र कोतले, सुभाष देशपांडे, श्रीकांत देशपांडे, प्रकाश सोनी, चंद्रशेखर वाड आदी उपस्थित होते.आधार जोडणीशिवाय रेशनचे धान्य द्यावेआधारकार्ड रेशनकार्डसोबत जोडले नसलेल्या नागरिकांनाही स्वस्त धान्य द्यावे. या गरजू शिधापत्रिकाधारकांना केवळ आधार जोडणी झाली नाही, म्हणून लाभापासून वंचित ठेवता कामा नये, असा प्रमुख मुद्दा समितीत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव आधारकार्ड रेशनकार्डशी लिंक न झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
भारतीय ग्राहक मंचचे नाशकात राष्टÑीय अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:56 AM