सिडको : नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या स्किल डेव्हलपमेंट हबच्या वतीने राष्ट्रीय कौशल्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. रॉय होते.दरवर्षाप्रमाणे यंदाही नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या स्किल डेव्हलपमेंट हबच्या वतीने राष्ट्रीय कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एस. रॉय यांनी पारंपरिक शैक्षणिक पद्धतीमुळे शिक्षण आणि कौशल्य यांच्यात निर्माण होणारे अंतर अणि सदर अंतर कमी करण्यासाठी उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. तसेच नवीन उद्योगांना एनईसीतर्फे पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. एनईसीच्या कौशल्य विभागाचे प्रमुख नीलेश कोकाटे यांनी एनईसीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कौशल्य उपक्रमांची माहिती दिली. तर डॉ. अभय वाघ यांनी औद्योगिक विकास आणि नवीन उद्योगामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळेल, याविषयी माहिती दिली. (वार्ताहर)
नाशिक इंजिनिअरिंग येथे राष्ट्रीय कौशल्य दिन साजरा
By admin | Published: July 20, 2016 12:31 AM