नाशिक : हल्लाबोल यात्रा व त्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात राष्टÑवादीचे नेते व्यस्त असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेली पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया येत्या आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना राष्टÑवादी कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सर्व जिल्हा निवडणूक निरीक्षकांना दिल्या असून, त्यादृष्टीने नाशिक जिल्ह्यात तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी यासंदर्भात सहा तालुक्यांमध्ये बैठका होऊन प्राथमिक पातळीवर नावांची चर्चा करून घेण्यात आली आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणीची निवड पक्षाध्यक्ष शरद पवार येत्या २९ एप्रिल रोजी करणार असल्याने तत्पूर्वी तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्णासाठी जिल्हा निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आल्याने त्यांनी २२ एप्रिलपर्यंत आपला अहवाल प्रदेशला सोपविण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णासाठी अविनाश गोविंद आदिक यांची नियुक्ती करण्यात आली असून, स्वत: आदिक यांनी गुरुवारी कळवण, सटाणा, मालेगाव या तालुक्याच्या बैठका घेऊन प्रांतिक सदस्यासाठी तीन व जिल्हा कार्यकारिणीसाठी सहा नावे तालुका राष्टÑवादीच्या बैठकीत निश्चित केली आहेत, तर अन्य तालुक्यांमध्ये तालुका निरीक्षक नेमण्यात आले आहेत. दि. २० व २१ रोजी पुन्हा आदिक नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या उपस्थितीत निफाड, नांदगावसह अन्य तालुक्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे २२ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्णाचा अहवाल प्रदेशला सादर केला जाणार असल्याचे आदिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तालुक्यातून कोणाची नावे जिल्ह्णावर पाठविली जातात याकडे इच्छुकांचे लक्ष लागले असून, प्रत्येकाने आपापल्यापरीने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. राष्टÑवादीच्या पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच तालुका व जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश वडजे, युवक कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वाजे, विद्यमान अध्यक्ष रवींद्र पगार यांची नावे घेतली जात आहेत. याशिवाय माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार दिलीप बनकर यांच्याही नावाची चर्चा होत असली तरी, विद्यमान आमदार जयंत जाधव यांनी जिल्हाध्यक्ष व्हावे अशी गळही इच्छुकांकडून घातली जात आहे. विशेष म्हणजे, या साºया निवडीत पक्षाचे नेते छगन भुजबळ यांचा कौल अतिशय महत्त्वाचा मानला जाणार असल्यामुळे राष्टÑवादीत वातावरण ढवळून निघाले आहे.
राष्टÑवादीच्या तालुका, जिल्हाध्यक्षपदासाठी फिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:58 PM
नाशिक : हल्लाबोल यात्रा व त्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात राष्टÑवादीचे नेते व्यस्त असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेली पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया येत्या आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना राष्टÑवादी कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सर्व जिल्हा निवडणूक निरीक्षकांना दिल्या असून, त्यादृष्टीने नाशिक जिल्ह्यात तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी यासंदर्भात सहा तालुक्यांमध्ये बैठका होऊन प्राथमिक पातळीवर नावांची चर्चा करून घेण्यात आली आहे.
ठळक मुद्देनिवडणूक निरीक्षक नियुक्त रविवारपर्यंत प्रक्रिया राबविणार