त्र्यंबकेश्वर : प्रलोभनांना बळी पडून मतदान करणे म्हणजे लोकशाहीचा अपमान होय, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केले.
येथील मविप्र समाज संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्त्र विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ह्यराष्ट्रीय मतदार दिवसह्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिंदे बोलत होते.
याप्रसंगी उपप्राचार्य सुरेश देवरे, प्रा. माधव खालकर, प्रा. नीता पुणतांबेकर, डॉ. अजित नगरकर, डॉ. संदीप माळी, डॉ. संदीप निकम, डॉ. शरद कांबळे, प्रा. मनोहर जोपळे, प्रा. संदीप गोसावी, प्रा. मिलिंद थोरात, डॉ. मनीषा पाटील, प्रा. शास्वती निरभवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. मनोज मगर यांनी ह्यराष्ट्रीय मतदार दिवसह्ण का सुरू झाला, याचा इतिहास आणि या दिवसाचे महत्त्व आणि उद्दिष्टे आपल्या भाषणातून विस्ताराने सांगितले. प्रास्ताविक प्रा. आशुतोष खाडे यांनी केले. परिचय प्रा. ज्ञानेश्वर माळी यांनी करून दिला.