नाशिक : शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जम्मू-काश्मीरातील कथुआ येथील बालिकेवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना फाशी द्यावी, मागणी या मागणीसाठी सिडकोत महिलांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला. जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षीय बालिकेवर पाशवी बलात्कार व हत्या तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सोळा वर्षीय मुलीवरील बलात्कार अशा दोन्ही प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असून, भाजपाच्या राज्यात महिला व बालिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत, अशी मागणी करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली सिडको, राणा प्रताप चौक येथे महिलांच्या वतीने कॅन्डल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. कॅन्डल मोर्चात सहभागी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, हिना शेख, पुष्पा राठोड, रजनी चौरसिया, संगीता चौधरी, सुजाता कोल्हे, मंगला मोरे, संगीता अहिरे, निता वडनेरे, संगीता सानप, विजया जाधव, प्रमिला पाटील, रंजना वाघ, शमा शेख, आशा ठाकरे, पूजा चौधरी, मंगल बागुल, अंजली निकम, प्रिया कापुरे, पुष्पा निकम, सविता कासार, प्रयाग कापुरे, नेहा नहिरे, कल्याणी जाधव, वैशाली तायडे यांसह आदी महिला उपस्थित होत्या.कथुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटताना दिसत असून, सामाजिक कार्यकर्त्या अनिता गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली काळ्या फिती बांधून देवळाली कॅम्प येथे लामरोडवरील भैरवनाथ मंदिर ते जमाल नाकापर्यंत कॅण्डल मार्च व मूक मोर्चा काढण्यात आला. जम्मूमधील कथुआ आणि उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या पार्श्वभूमीवर देवळालीच्या लामरोड भागातील नागरिकांनी एकत्र येत निषेध नोंदविला. आरोपींना कठोर शासन व्हावे, दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, यासह अनेक पोस्टर घेऊन परिसरातील नागरिकांसह अरु ण जाधव,विठ्ठलराव खातळे, कैलास गोडसे, सागर गोडसे, यास्मिन नाथानी, वैशाली निकम, वंदना माळी, विजय निकम, संजय जाधव, राहुल धुर्जड, राजेश धुर्जड, राजश्री जाधव, सुनील चव्हाणके, तेजस शेळके, विनोद जाधव, रघुनाथ गोरखे, रेखा जाधव, सचिन पाळदे, सविता गोडसे आदींसह नागरिक सहभागी झाले होते.
राष्टवादी महिलांचा ‘कॅन्डल’ मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:28 AM