नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जाहिरातीतून सांगणा-या ‘बहुत हुवी महंगाई की मार..’ असे म्हणणा-या ‘त्या’ काकू आता कुठे गेल्या? पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅसचे दरवाढ होत असताना आता काकू जाहिरातीतून का बोलत नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने उपस्थित करत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सत्ताधारी सरकारच्या विरोधात बुधवारी (दि.३१) जोरदार आंदोलन करण्यात आले.पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यासारख्या इंधनाच्या होणा-या भरमसाठ दरवाढीमुळे राज्यातील नव्हे तर देशाची जनता त्रस्त झाली आहे; मात्र सरकारला त्याचे काहीही देणेघेणे नाही. सातत्याने पेट्रोल, डिझेलची भाववाढ केली जात आहे यामुळे जनता वेठीस धरण्याचा प्रकार सरकारकडून सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने यावेळी निवेदनातून करण्यात आला. आंदोलनात ढकलगाडीवर ठेवण्यात आलेली दुचाकी लक्षवेधी ठरली.भाजप-शिवसेना युती सरकारने राज्यातील इंधन दरवाढ नियंत्रणात आणावी, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. काही दिवसांपुर्वी शिवसेनच्या वतीने द्वारकेवर चक्का जाम आंदोलन करुन राज्य सरकारला घरचा आहेर देण्यात आला होता. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने काढलेल्या या मोर्चाद्वारे शिवसेनेने हस्तक्षेप करावा, आणि इंधन दरवाढ त्वरित कमी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सत्ताधारी भाजपा सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करत इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात प्रदेश चिटणीस अर्जुन टिळे, सोमनाथ खताळे, जिल्हा परिषदेच्या सभापती अर्पणा खोसकर, प्रेरणा बलकवडे, पुरूषोत्तम कडलग, अंबादास खैरे, नंदन भास्करे आदिंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.मोटारीला बांधला दोरखंडइंधनाच्या होणा-या भरमसाठ दरवाढीमुळे मोटारीत डिझेल, पेट्रोलसारखे इंधन भरणे परवडणारे नाही, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोटार उभी करुन तीला दोरखंड बांधून ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोटारीला बांधलेला दोर दुतर्फा उभे राहून ओढत भाजपा सरकार व वाढती महागाईविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आंदोलन : ‘त्या’ काकू आता वाढत्या महागाईवर का बोलत नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 4:28 PM
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जाहिरातीतून सांगणा-या ‘बहुत हुवी महंगाई की मार..’ असे म्हणणा-या ‘त्या’ काकू आता कुठे गेल्या? पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅसचे दरवाढ होत असताना आता काकू जाहिरातीतून का बोलत नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने उपस्थित करत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सत्ताधारी सरकारच्या विरोधात बुधवारी (दि.३१) जोरदार आंदोलन करण्यात आले.पेट्रोल, डिझेल, ...
ठळक मुद्देसरकारला त्याचे काहीही देणेघेणे नाही मोटारीत डिझेल, पेट्रोलसारखे इंधन भरणे परवडणारे नाही