नाशिक दि.२८ (प्रतिनिधी) :- गेल्या ३ वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप -शिवसेना युती सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेच्या समस्या, महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांच्या समस्या, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, आरोग्याच्या समस्या, कुपोषण यांसारख्या विविध समस्यांवर भाजप-शिवसेना युती सरकारने तातडीने लक्ष घालावे अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत दिंडोरी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून हल्लाबोल आंदोलन करण्यात आले होते. आज मंगळवार दुसऱ्या दिवशी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार श्री.शेवाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दि.३० नोव्हेंबर रोजीपर्यंत सर्वच तालुक्यांच्या तहसीलदार कार्यालयांवर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 2:24 PM
शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेच्या समस्या, महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांच्या समस्या, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, आरोग्याच्या समस्या, कुपोषण यांसारख्या विविध समस्यांवर भाजप सपशेल अपयशी
ठळक मुद्दे सर्वच तालुक्यांच्या तहसीलदार कार्यालयांवर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.विविध समस्यांवर भाजप-शिवसेना युती सरकारने तातडीने लक्ष घालावे अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा