कळवण : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने राबविण्यात येणाºया ‘सेल्फी विथ खड्डे’ या मोहिमेत जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील रस्ते चकाचक व खड्डेमुक्त होते; परंतु सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकण्यासाठी राष्टÑवादी कॉँगे्रसच्या वतीने सेल्फी विथ खड्डे मोहीम राबविण्यात येत आहे. रस्त्यांवर तयार झालेल्या खड्ड्यांसोबत सेल्फी काढून ते सोशल माध्यमाद्वारे प्रकशित करून झोपलेल्या सत्ताधारी सरकारला जाणे करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘खड्डे दाखवा, एक हजार रुपये मिळवा’ असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसोबत सेल्फी घेऊन तो फोटो ट्विटर व फेसबुक पेजवर व्हायरल करत जोरदार प्रतिउत्तर दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा वतीने ‘सेल्फी विथ खड्डे’ ही मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील अनेक शहरातील कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. कळवण येथील राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांनी नाशिक-कळवण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसोबत सेल्फी काढला आहे. हे फोटो सोशल माध्यमातून प्रकाशित करून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना टॅग केले जात आहे. यामुळे हे खड्डे थेट मंत्र्यांपर्यंत पोहचत आहेत. या उपक्र मांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, आमदार नरहरी झ्रिवाळ, विष्णुपंत म्हैसधुणे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरु षोत्तम कडलग, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. योगेश गोसावी उपस्थित होते.अॅड.शरद गायधनी, राजाराम मुरकुटे, नामदेव कोतवाल, कैलास मोरे, जयराम शिंदे, बाळासाहेब म्हस्के, सोमनाथ खातळे, विजय पवार, राजेंद्र भामरे, नामदेव सावंत आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ‘सेल्फी विथ खड्डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 12:42 AM