उत्तमनगर परिसरात बुद्ध विहार ते ओम स्वीट याठिकाणी रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यांवरील धूळ दुकानांमध्ये उडत आहे. याच रस्त्यावर लहान गटापासून ते दहावी पर्यंत शाळा व तसेच कॉलेजही असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत व कॉलेजला येताजाताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सदरचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून, भर रहदारीच्या रस्त्यावर सुरू असलेल्या या कामामुळे परिसरातील रहिवाशांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सदरचे काम सुरू करण्यापुर्वी महापालिकेने त्याचे व्यवस्थित नियोजन केले नाही असा आरोप करीत, या रस्त्यावरील रहिवासी तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्तमनगर परिसरातील खराब रस्त्यांवर रांगोळी काढून अन काळे झेंडे लावून आंदोलन केले. यावेळी पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष विशाल डोखे, पुष्पा राठोड, मनोज हिरे, वंदना पाटील, किशोरी गायकवाड, अक्षय पाटील, कृष्णा काळे, अजय पाटील, रोहित पाटील, बाळासाहेब जमधडे, सुनील घुगे, करण आरोटे आदी उपस्थित होते .
कोट====
प्रभागात ड्रेनेजची मोठी समस्या होती. त्यामुळे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या काही दिवसातच हे काम पूर्ण होऊन रस्ता खडीकरण व डांबरीकरण केले जाईल.
-रत्नमाला राणे,नगरसेवक
(फोटो ०४ सिडको)