शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कंपन्यांकडून नाशिककरांची फसवणूक : 'नेटवर्क' हवाय, मग बाल्कनीत बसा किंवा टेरेसवर जा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 2:14 PM

मोबाईल नेटवर्क पुरविणाऱ्या नामांकित कंपन्यांकडून ‘४जी’च्या नावाखाली नाशिककरांची एकप्रकारे लूट केली जात आहे. ग्राहकांना जलद इंटरनेट वापरण्यासाठी घरामधून दारात किंवा अंगणात बसण्याची वेळ येत आहे.

ठळक मुद्देउपनगरांमध्ये तर घरात प्रवेश करताच मोबाईलचे नेटवर्क सिग्नल गायब ४जी सेटींग्ज; ‘०.१४केबी’चा वेगमोबाईल नेटवर्कची बोंबाबोंब असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप

नाशिक : सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम, सुपरफास्ट इंटरनेट, नेटवर्क अशी जाहितरात करत मोबाईल नेटवर्क पुरविणाऱ्या नामांकित कंपन्यांकडून ‘४जी’च्या नावाखाली नाशिककरांची एकप्रकारे लूट केली जात आहे. ग्राहकांना जलद इंटरनेट वापरण्यासाठी घरामधून दारात किंवा अंगणात बसण्याची वेळ येत आहे. महापालिकेच्या हद्दीतील काही उपनगरांमध्ये तर घरात प्रवेश करताच मोबाईलचे नेटवर्क सिग्नल गायब होत असल्याचा अनुभव येत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.शहरात हजारो लोक स्मार्टफोनचा वापर करु लागले आहे. प्रत्येक व्यक्ती अधिक दिवसांचा कालावधी मिळविण्यासाठी किमान पाचशे रुपयांचा इंटरनेटचा रिचार्ज करतो. ५०० रुपयांमध्ये दररोज एक किंवा दीड जीबी डेटा वापराची परवानगी देत एकूण ८४ ते ९० दिवसांचा कालावधी कंपन्यांकडून दिला जातो; मात्र या कालावधीत ग्राहकांना डेटाचा स्पीड मिळविताना दमछाक करावी लागत आहे. रात्रीच्यावेळी काही भागांमध्ये तर सिग्नल येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अशोका मार्ग सारख्या परिसरात सोसायट्यांमध्ये प्रवेश करताच मोबाईलची ‘रेंज’ गायब होते. तसेच शरणपूररोड, गंगापूररोड, डिसूजा कॉलनी, इंदिरानगर, गोविंदनगर, सिडको, उपनगर आदि भागांमध्ये ‘इनडोअर’ मोबाईलची रेंज उपलब्ध होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.नाशिक महापालिका क्षेत्रात २० किलोमीटरच्या परिसरात मोबाईल नेटवर्कची बोंबाबोंब असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरात मोबाईल नेटवर्कची अशी अवस्था असेल तर ग्रामिण भागात ‘कनेक्टिवीटी’ची काय अवस्था असेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मोबाईल कंपन्यांकडून नेटवर्क टॉवरच्या फ्रेक्वेन्सीची अवस्था तपासून त्यामध्ये योग्य ती तांत्रिक दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे. डेटाचा स्पिड मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्राहक तक्रार निवारणासाठी वारंवार कंपनीच्या ग्राहक सेवा अधिका-यांशी संपर्क साधूनदेखील उपयोग होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले‘०.१४केबी’चा वेगइंटरनेटची ४जी सेटींग्ज  केल्यानंतर ‘०.१४ ते ०.८३केबी’चास्पीड मिळत असल्याने नेटवर्कची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नेटवर्कमध्ये सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :NashikनाशिकMobileमोबाइलInternetइंटरनेट