शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

स्वत:पेक्षा राष्ट्राचे स्थान महत्त्वाचे पंडित : चांडक-बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:38 AM

नाशिकरोड : छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण न करता लोककल्याण म्हणून राज्य केल्याने त्यांना लोककल्याणकारी राजा म्हटले जाते.

ठळक मुद्दे शिवरायांचे विचार आदर्शवत दोन दिवसीय परिषदेतील आढावा सादर

नाशिकरोड : छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण न करता लोककल्याण म्हणून राज्य केल्याने त्यांना लोककल्याणकारी राजा म्हटले जाते. मराठ्यांमध्ये जी ऊर्जा होती त्याचा मूळ स्त्रोत शिवराय होते. शिवरायांचे विचार आदर्शवत असून, स्वत:पेक्षा राष्टÑ महत्त्वाचे हे धोरण प्रत्यक्ष अमलात आणले पाहिजे, असे प्रतिपादन गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य एस. बी. पंडित यांनी केले.चांडक-बिटको महाविद्यालयात दोनदिवसीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य आणि आधुनिक काळातील त्यांचा संदर्भ या विषयावरील राष्टÑीय परिषदेच्या समारोप सत्रात अध्यक्ष पदावरून प्राचार्य पंडित बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. एस.जी. देवधर, उपप्राचार्य डॉ.डी.जी. बेलगावकर, प्राचार्य राम कुलकर्णी, डॉ.ए.आर.पठारे, प्रा. जयंत भाभे, डॉ. महेश औटी, डॉ. मंजुषा कुलकर्णी आदी उपस्थित होते. सकाळच्या दोन सत्रात शिवाजी महाराज आणि किल्ले प्रशासन, राजनीती या विषयांवर डॉ. विनायक गोविलकर, गिरीश टकले, उद्योजक धनंजय बेळे, पांडुरंग बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० प्राध्यापकांनी संशोधनपर प्रबंध सादर केले. यावेळी प्राचार्य राम कुलकर्णी यांनी दोन दिवसीय परिषदेतील आढावा सादर केला. तर डॉ. डी. जी. बेलगावकर यांनी ५ सत्रांचा अहवाल सादर केला. सूत्रसंचालन प्रा. विजया धनेश्वर, डॉ. शायोन्ती तलवार यांनी केले व आभार प्रा. जयंत भाभे यांनी मानले. भारत इतिहास परिषद पुणेचे सचिव पांडुरंग बलकवडे यांनी शिवरायांचे जीवनकार्य व विचार केवळ अभ्यासापुरते नसून प्रत्यक्ष कृतीत आणण्याची गरज आहे. शिवरायांनी आरमार उभारून सागरावर परकीयांच्या वर्चस्वाला आव्हान दिले. त्यांची रणनीती-राष्टÑधर्म हा प्रथम धर्म होता. शिवरायांचे युद्धतंत्र तर अचंबित करणारे होते, असे बलकवडे यांनी स्पष्ट केले.