प्रतीकात्मक सिलिंडर परत : दरवाढ कमी करण्याची मागणी
नाशिक : केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ९६ रुपये इतकी दरवाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस सिलिंडर घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकाºयांना सिलिंडर परत करण्याचा आग्रह धरल्याने काही वेळ पोलीस व आंदोलकांमध्ये ताणाताणीही झाली.केंद्र सरकारने इंधनाच्या दरात केलेल्या वाढीपाठोपाठ घरगुती गॅसच्या दरातही ९६ रुपये इतकी वाढ केली असून, त्याची अंमलबजावणी मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच सकाळी अकरा वाजता राष्टÑवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रिकामे गॅस सिलिंडर घेऊन आंदोलन सुरू केले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सत्तेवर येताना मोदी यांनी देशातील महागाई दूर करू, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षात महागाईचा आलेख वाढतच चालला असल्याचा आरोप शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केला.या आंदोलनात नाना महाले, गजानन शेलार, संजय खैरनार, अंबादास खैरे, सुरेश आव्हाड, अनिता भामरे, समिना मेमन, सुषमा पगारे, रंजना गांगुर्डे, महेश भामरे, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, राजेश भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी आणले घरातले सिलिंडरकार्यकर्त्यांनी घरातूनच रिकामे गॅस सिलिंडर आणले असल्याने त्यांनी ते घेऊन जिल्हाधिकाºयांना परत करण्यासाठी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडविल्यानंतर काही वेळ तणावही निर्माण झाला. यावेळी शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा फटका सामान्य जनतेला बसत असून, सरकारने तत्काळ ही दरवाढ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.