लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कुसुमाग्रज मराठी विचार मंच, नाशिकच्यावतीने वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत गाजलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त नाटकातील स्वगत सादरीकरणाच्या ऑनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात कुमार गटात बेळगावचा सोहम शहापूरकर तर खुल्या गटात पालघरच्या तुकाराम नाईक यांनी विजेतेपद पटकावले.
या स्वगत स्पर्धेला महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरुन भरघोस प्रतिसाद मिळाला. सदर स्पर्धा कुमार गट आणि खुला गट अशा दोन गटात घेण्यात आली होती. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ नाट्य कलावंत उपेंद्र दाते आणि प्रमोद टेंबरे यांनी काम पाहिले.तसेच डिझायनर भूषण क्षीरसागर, व्हिडिओ संकलक महेश कावळे,तांत्रिक सहाय्य उपेंद्र वैद्य आणि मेधा वैद्य यांनी तांत्रिक योगदान दिले. संस्थेचे विश्वस्त शाम पाडेकर, सुभाष सबनीस यांनी स्पर्धा प्रमुख म्हणून काम पाहिले. तर अध्यक्ष सतीश बोरा, सरचिटणीस दिलीप बारवकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. पन्नास वर्षांपूर्वी २३ डिसेंबरला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता त्यानिमित्ताने बुधवारी(दि.२३) सायंकाळी ६ वाजता कालिदास कला मंदिरात नटसम्राट नाटकात प्रमुख भूमिका साकारणारे ज्येष्ठ कलावंत उपेंद्र दाते यांचा नटसम्राट नाटकाचा एकपात्री प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. त्याच कार्यक्रमात पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
इन्फो
कुमार गट विजेते
प्रथम -सोहम संदिप शहापूरकर(बेळगाव), व्दितीय - वेदिका भूषण पंचभाई (नाशिक) , तृतीय - राजसी दीपक गोजगेकर (बेळगाव)
उत्तेजनार्थ -युगा मिलिंद कुलकर्णी(नाशिक) आणि गार्गी सचिन ब्राह्मणकर(नाशिक)
इन्फो
खुला गट विजेते
प्रथम - तुकाराम माधव नाईक (पालघर), व्दितीय - विवेकानंद राजाराम दासरी (ठाणे ), तृतीय क्रमांक- सुरेंद्र जगदीश गुजराथी (संगमनेर )
उत्तेजनार्थ- महेंद्र शंकर गुरव (गुहागर) अविनाश रामगीर गोस्वामी (सांगली)