नाशिक वसंत व्याख्यानमालेत मंगळवारी (दि. २५) स्व. माणिकलालजी भटेवरा यांच्या स्मृती व्याख्यानांतर्गत ‘आनंदी जीवनाचा मार्ग’ या विषयावर पुष्प गुंफले, यावेळी त्या बोलत होत्या.
साध्वी प्रीतीसुधाजी यांनी सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात प्रत्येकाने विवेकाने राहण्याचे आवाहन केले. शिस्तीचे पालन झाल्यास कोरोना वाढणार नाही, ‘प्रसंगानुरूप सावध व्हावे’ या समर्थांच्या उक्तीप्रमाणे उपदेश करताना त्यांनी शिवरायांचा दाखला दिला.
पालकांनी मुलांवर आणि मुलींवर योग्य ते संस्कार केले पाहिजे. आईने मुलीला सहनशीलतेचे धडे द्यावेत, जेणेकरून तिचे माहेर आणि सासर दोन्हीही सुखी होईल. निर्णयक्षमता, सहनशीलता स्वीकारून लोभापासून दूर राहिले तर जीवन आनंदी होईल, असेही त्या म्हणाल्या.
साध्वी मधुस्मिताजी यांनी कोरोना, सरकारची भूमिका, अस्वस्थ समाज यावर भाष्य करताना अशा परिस्थितीत राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. संतांना राजकारण आवडत नाही, असा स्वानुभवही त्यांनी मांडला.
जीवनात विविध प्रकारचे लोक येतात, त्यात वाट पाहणारे आहेत, वाट शोधणारे आहेत, वाट दाखवणारे पण असतात आणि वाट लावणारे सुद्धा, अशा वेळी मन, वचन, काया या तीन प्रकृतींमधून मनाला प्रेरित करू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
आजचे व्याख्यान
बी. जी. वाघ
भगवान गौतम बुद्ध
---
छायाचित्र आर फोटावर २५ वसंत व्याख्यानमाला
===Photopath===
250521\25nsk_13_25052021_13.jpg
===Caption===
वसंत व्याख्यानमालेत बेालताना प्रीतीसुधारी व मधूस्मिताजी