ओझर : ग्रामीण भागात शेवटच्या टप्प्यात रोजचा पडणारा पाऊस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरण्याच्या मार्गावर आहे. गुरु वारी (दि.१०)ओझर व आसपास भागात झालेला धुवाधार पाऊस त्याचीच अनुभूती देत गेला.द्राक्ष उत्पादक बागायतदारांच्या नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात बहुतांश भागात छाटण्या सुरू होऊन जातात. त्यात बागलाण पट्ट्यात अर्ली छाटणी मुळे तेथील शेतकऱ्यांनी आॅगस्ट महिन्यांपासून ज्या छाटण्या केल्या होत्या त्यातील बरीच द्राक्षबाग ही सततच्या ढगाळ वातावरणामुळे व पडणाºया पावसाने तेथील बागांमध्ये डावणीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर डोके वर काढत आहे. तर निफाड, चांदवड, दिंडोरी, नाशिक व सिन्नरच्या काही भागांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा पावसाळा हा लांबल्याने व सुरवातीच्या काळात अपेक्षित पाऊस न पडल्याने या भागातील बागायतदारांमध्ये देखील चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे बागलाण पट्यातील नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी द्राक्ष निर्यात यंदा पुढे जावू शकते. एकूणच या सर्व उपाययोजना बघता पाऊस आणखी किती दिवस पडतो त्यावर उत्पादन अवलंबून राहील. त्यामुळे मागील वर्षी मोठी आर्थिक झळ बसलेल्या शेतकºयांना यंदा ती भरून निघते की नाही अशी शंका आहे.प्रतिक्रि या...ग्रामीण भागातील बागलाण पट्यात अर्ली प्लॉट मध्ये अनेक ठिकाणी डावणीचा प्रादुर्भाव आहे. तर मुख्य भागात मात्र लांबलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी अद्याप त्या सुरू व्हायच्या आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात छाटण्या एकाच वेळी झाल्यास बाजारात तयार माल मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांनी योग्य उपाय योजना करावी.- गौरव कर्पे, द्राक्ष उत्पादक शेतकरी.
निसर्गाचा लहरीपणा द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 9:12 PM
ओझर : ग्रामीण भागात शेवटच्या टप्प्यात रोजचा पडणारा पाऊस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरण्याच्या मार्गावर आहे. गुरु वारी (दि.१०)ओझर व आसपास भागात झालेला धुवाधार पाऊस त्याचीच अनुभूती देत गेला.
ठळक मुद्देओझर : लांबलेल्या पावसाने द्राक्ष छाटण्या लांबणीवर