नेवरगाव येथील मेळन या आदिवासी वस्तीत गंगाधर बाळा सोनवणे यांचा परिवार वास्तव्यास होता. मोलमजुरी हेच या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यांना शासनाच्या उज्वला योजने अंतर्गत घरगुती गॅसचा लाभ मिळाला होता. शनिवारी कुटुंबप्रमुख गंगाधर सोनवणे, पत्नी अलका, मुले बाबासाहेब व राहुल हे चारही सदस्य मजुरीच्या कामावर असताना सायंकाळी गॅसमुळे घराला आग लागली. या आगीत संसारोपयोगी साहित्य, दहा कोंबड्या, रोख पन्नास हजार रुपये व कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीमुळे हा परिवार उघड्यावर आला आहे. पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड, नवनाथ काळे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य छगन आहेर, माजी सरपंच उद्धव बोराडे, अरुण पेंढारे, अनिल कदम, पोलिस पाटील श्रावण बोराडे, भरत गडाख, शरद गडाख यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. सायंकाळी उशीरापर्यंत घटनेचा पंचनामा झालेला नव्हता.
नेवरगावी आगीत संसार भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 6:51 PM