नांदगाव : सर्प म्हटले की अंगावर काटे उभे राहतात. पण जखमी झालेल्या विषारी कोब्रा जातीच्या नागावर ४० मिनिटे यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवदान देण्यास नांदगावच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना यश आले आहे. नांदगाव ही शस्त्रक्रिया पार पडली.तालुक्यातील जळगाव बु।। येथील शेतकरी बाळकृष्ण बुरकुल यांच्या शेतातील विहिरीच्या भरावाची माती जेसीबीच्या सहाय्याने उचलण्याचे काम सुरू होते. दरम्यान भरावाखाली अचानक नाग दिसला. जेसीबीच्या फावड्याखाली तो दाबला जाणार तेवढ्यातबुरकुल यांनी बघितले. त्यांनी काम त्वरित थांबवून सर्पमित्र प्रभाकर निकुंभ व समाधान कांदे यांना माहिती दिली.कांदे व निकुंभ यांनी जखमी नागाला उपचारासाठी नांदगाव येथे घेऊन आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. उगलमुगले, डॉ. एस. एस. बळवंत, डॉ. ए. ए. आडगळे, डॉ. योगेश वाणी, अण्णा पवार यांनी ४० मिनिटे शस्त्रक्रिया करून नागाला जीवदान दिले. उपचारानंतर नागास वनाधिकारी सुनील खंदारे यांच्याकडे स्वाधीन केले.
शस्त्रक्रिया करून वाचविले नागाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 6:16 PM
सर्प म्हटले की अंगावर काटे उभे राहतात. पण जखमी झालेल्या विषारी कोब्रा जातीच्या नागावर ४० मिनिटे यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवदान देण्यास नांदगावच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना यश आले आहे. नांदगाव ही शस्त्रक्रिया पार पडली.
ठळक मुद्देजळगाव बुद्रुक येथील घटना