नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मुंबईनाका, गंगापूर पोलीस ठाण्यांसाठी लवकरच हक्काची जागा गृहमंत्रालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पोलीस वसाहतीमधील समस्या आणि मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी गृहविभाग सातत्याने सकारात्मक प्रयत्न क रत आहे, असे प्रतिपादन गृह व शहर विकास खात्याचे मंत्री रणजित पाटील यांनी केले.पोलीस मुख्यालय वसाहतीमध्ये आयोजित विविध विकासकामांच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी पाटील प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, लक्ष्मण सावजी, सुहास फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पाटील म्हणाले, पोलिसांचे गृहनिर्माण प्रकल्प सोयी-सुविधांनुसार उभारणी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. राज्यात पंधरा वर्षांच्या तुलनेत त्याचा आलेख या सरकारच्या काळात वाढला आहे. पोलिसांच्या जुन्या वसाहतींमध्ये मूलभूत सोयी-सुविधा देण्याचाही सतत प्रयत्न केला जात असून, त्यासाठी धोरणात्मक निर्णयांमध्ये बदलही केले आहे. कारण शहराच्या व राज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी २४ तास कार्यरत असणा-या पोलीस दलासाठी त्याची खरी गरज आहे, याची जाणीव गृह विभागाला आहे.विधीमंडळात फरांदे यांच्याकडून शहरातील या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या जागेसंदर्भात लक्षवेधी मांडली जात होती. याबाबत लवकरच त्यादृष्टीने सरकारने पावले उचलली आहे. पुढील अधिवेशनात त्यांना या लक्षवेधी मांडण्याची संधी गृह खाते देणार नाही. महापालिका, गृह विभागाचे संयुक्त प्रयत्नाने जागा दोन्ही पोलीस ठाण्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या स्वतंत्र इमारतीचा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याचे पाटील यांनी यावेळी आश्वासन दिले. मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांना वाढीव एफएसआय देण्यात आला असून, पोलीस क र्मचा-यांसाठी किमान ५०० फुटांचे घर असावे हे सरकारने मान्य केले आहे, असेते म्हणाले.
‘नो हॉँकिंग डे’ संकल्पना राज्यभर राबविणारनाशिक पोलीस आयुक्तालयाकडून ‘नो हॉँकिग डे’ संकल्पना राज्यभर राबविण्यासाठी गृह विभाग प्रयत्नशील आहे. ही चांगली संकल्पना ध्वनी प्रदूषणावर मात करणारी आहे. मोठी शहरे व मोठी होऊ पाहणाºया शहरांमध्ये लोकजागृतीसाठी अशी संकल्पना पूरक ठरते. एमपीआयडी कायद्याचा योग्य वापर पोलीस आयुक्तालयाकडून आर्थिक गुन्ह्यांची उकल व संबंधित ठेवीदारांना मिळवून दिलेला लाभ कौतुकास्पद व अभिमानास्पद असल्याचे पाटील म्हणाले.