नाशिक : गोविंदनगर, इंदिरानगर, गंगापूररोड, उपनगर, सातपूर या भागात सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यास पोलिसांना अद्याप यश येत नसल्याने महिलावर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गणेशोत्सवकाळातही सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आगामी नवरात्रोत्सव तोंडावर आला असताना पुन्हा सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडू लागल्याने महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी (दि.२१) गोविंदनगर येथे रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास ज्योती सुहास सोनवणे (४४) या गृहिणी भाजीपाला खरेदी करून घरी पायी जात होत्या. यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा तरूण चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी समोरून हिसकावून पळ काढला. सुमारे ३० हजार रूपये किंमतीची एक तोळ्याची सोनसाखळी चोरी झाल्याची फिर्याद सोनवणे यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक चेतन श्रीवंत करीत आहेत.चार दिवसांपुर्वीच सकाळी ७.३० वाजता मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. दीपालीनगर येथे माधुरी अजित रुंद्रे (६७) या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळ्यांची सोनसाखळी लांबविली. रुंद्रे या सकाळी फेरफटका मारण्यासाठी जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुण चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. सुमारे ७० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. चार दिवसांत मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरी सोनसाखळीची घटना घडली.नवरात्रोत्सवात मोठे आव्हानजेमतेम पाच ते सहा दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवात महिला, युवती मोठ्या संख्येने सकाळी आणि रात्री घराबाहेर पडतात. यावेळी पुन्हा अशाप्रकारचे गुन्हे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दुचाकीस्वार चोरटे सकाळी आणि सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढत असल्याचे अद्याप घडलेल्या घटनांमधून समोर आले आहे. कालिकामातेच्या दर्शनासाठी महिला विविध भागांमधून पायी पहाटे मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील मंदिरात दाखल होतात. रात्री उशिरादेखील या भागातून महिलांची वर्दळ नवरात्रोत्सवात असणार आहे. त्यामुळे मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या पोलिसांसह सर्वच पोलिस ठाण्यांना आपआपल्या हद्दीत पहाटेपासून सायंकाळपर्यंत पोलीस गस्त अधिक सक्षम करावी लागणार आहे.--
नवरात्रोत्सव तोंडावर : २० दिवसांत ७ चेन स्नॅचिंग; पोलिसांपुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 2:14 PM
जेमतेम पाच ते सहा दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवात महिला, युवती मोठ्या संख्येने सकाळी आणि रात्री घराबाहेर पडतात.
ठळक मुद्देकालिकामातेच्या दर्शनासाठी महिला पहाटे पायी दाखल होतातगणेशोत्सवकाळातही सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या महिलावर्गात तीव्र नाराजी व्यक्त