नाशिक : नवरात्रनिमित्त शहराच्या ग्रामदेवता मानल्या जाणाऱ्या कालिकादेवीचा यात्रोत्सव सध्या सुरू आहे. भाविकांची मंदिरात पहाटसमयी व सायंकाळी दर्शनासाठी गर्दी उसळत आहे. याचा फायदा घेत औरंगाबादच्या दोघा महिला चोरांनी भाविकांच्या वेशात मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करत मंगळवारी (दि.१) सकाळी एका महिलेचे मंगळसूत्र या चोरट्या महिलेने लांबविले. जागरूक महिलेने त्या चोरट्या महिलेस धरून संशयावरून पोलिसांच्या हवाली केले. दुसºया एका महिला भाविकाच्या हातातून मोबाइल हिसकावून पळणा-या महिला चोरासदेखील बंदोबस्तावरील महिला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले. या दोन्ही महिला औरंगाबादच्या असल्याचे तपासात पुढे आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कालिकादेवी यात्रोत्सवानिमित्त मुंबईनाका परिसरातील मंदिराभोवती पोलीस आयुक्तालयाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. साध्या वेशातील पोलीसदेखील याठिकाणी तैनात आहे. तसेच २४ तास पोलिसांकडून मदत केंद्र उभारून सातत्याने भाविकांना सावधानतेच्या सूचना ध्वनिक्षेपकावरून पोलीस देत आहेत. त्यामुळे भाविक गर्दीमध्येदेखील सावध राहत आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास एका मंगळसूत्र चोरी करणाºया महिलेला भाविक महिलेने ओळखून पोलिसांच्या हवाली केले. तसेच दुस-या घटनेत सकाळी एक महिला चोर भाविकाच्या हातातील मोबाइल हिसकावून गर्दीतून पळ काढताना सुरक्षारक्षकांच्या नजरेस आली. तत्काळ महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. संशयित रोशनी संतोष चव्हाण (२०, रा. सिल्लोड, औरंगाबाद), चिंगू अशोक भोसले (२२,रा. औरंगाबाद रेल्वे स्थानक परिसर) या अंगझडती घेतली असता महिला पोलिसांना ५ ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, १८ हजार रुपये किमतीचा मोबाइल मिळून आला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात दोघा महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अंकुश जाधव हे करीत आहेत.पोलिसांना महिला टोळीचा संशयऔरंगाबादच्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या अजून कोणी महिला, पुरुष साथीदार अथवा टोळीचा कालिका यात्रोत्सव, भगूरच्या रेणुका देवी यात्रोत्सवात शिरकाव झालेला आहे का, याचीही चाचपणी पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे. याप्रकरणी बंदोबस्तावर असलेल्या सर्व पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. साध्या वेशातील पोलीसदेखील यात्रेत होणाºया गर्दीवर लक्ष ठेवून आहे.
नवरात्रोत्सव : कालिका देवी मंदिर परिसरातून दोघी महिला चोर ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 4:14 PM
कालिकादेवी यात्रोत्सवानिमित्त मुंबईनाका परिसरातील मंदिराभोवती पोलीस आयुक्तालयाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. साध्या वेशातील पोलीसदेखील याठिकाणी तैनात आहे
ठळक मुद्देपोलिसांना महिला टोळीचा संशयपोलिसांनी महिलांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी सुरू केली