पंचवटी : झेप बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, यशस्विनी सामाजिक अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कोणार्कनगर येथील पंचकृष्ण लॉन्स येथे नऊवारी साडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, मंगला कमोद, महिला पोलीस उपनिरीक्षक हर्षाराणी देवरे हे होते. यावेळी डॉ. कमोद व कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रसंग सांगून मनोगत व्यक्त केले. श्रावणी बागुल हिने मी सावित्री बोलते आधारित स्त्रीभू्रण हत्येवर एकांकिका सादर केली. कार्यक्र माचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्ष सुनीता निमसे यांनी, तर सूत्रसंचालन सुनयना चव्हाण यांनी केले. कार्यक्र माला पुष्पा राठोड, संजीवनी म्हैसतुके, मंगला माळी, ज्योती विसपुते, अल्का जाधव, शैलजा ढिकले आदिंसह महिला उपस्थित होत्या. स्पर्धेत मोठ्या गटातून प्रथम क्र मांक पूजा निमसे, द्वितीय क्र मांक गायत्री बैरागी तर डॉ. संपदा घोलप तृतीय क्र मांकाचे मानकरी ठरले, तर लहान गटातून अनुष्का माळी, द्वितीय क्र मांक रश्मी गायकवाड तर भक्ती पवार तृतीय क्र मांकाची मानकरी ठरली. या विजेत्या स्पर्धेकांना पैठणी साडी व पारितोषिक देण्यात आले.
यशस्विनी सामाजिक अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने नऊवारी साडी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:44 AM