नायगाव : येथील वाडीत असणाऱ्या शनैश्चर महाराजांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवाला कावडी मिरवणुकीने प्रारंभ झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. ७) पहाटे देवतांच्या मुखवट्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील तरुणांनी कावडीद्वारे आणलेल्या गोदावरी व दारणाच्या पवित्र जलाने मूर्तीवर जलाभिषक करण्यात आला.दरम्यान संबळ - पिपाणीच्या गजरात कावडीची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी सजवलेल्या बैलगाडीतून शनैश्चरांच्या मुखवट्याची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आबालवृद्धांसह तरुण व महिलांनी शोभायात्रेत सहभाग घेतला होता. त्यानंतर जोगलटेंभी रस्त्यावरील मैदानावर शोभेच्या दारू उडवण्यात आली. यावेळी भाविकांनी गर्दी केली होती. रात्री करमणुकीसाठी लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेच्या दुसºया दिवशी रविवारी सकाळी हजरीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी कुस्त्यांच्या दंगली होणार आहेत, दंगलीत अनेक पहिलवान हजेरी लावणार आहेत, अशी माहिती राजेंद्र काकड, गोदा युनियनचे संचालक संतू पाटील, दत्तात्रय गरकळ, परसराम बोडके आदींनी दिली. भाविकांनी यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
नायगाव : शनैश्चर महाराजांच्या यात्रोत्सवासाठी भाविक दाखल यात्रेनिमित्त कावडी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:37 AM