इगतपुरी - येथील उपनगराध्यक्षपदी नईम खान यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर स्विकृत नगरसेवकपदी माजी नगरसेवक योगेश चांडक व विनोद कुलथे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपालिकेची आज निवडणुकीनंतर प्रथमच सर्वसाधारण सभा मुख्याधिकारी डॉ विजय कुमार मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली .या वेळी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांच्या अध्यक्षतेखाली तथा पीठासंन अधिकारी म्हणून सदरची सभा घेण्यात आली. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नईम खान यांचा एकमेव अर्ज दाखल झाला, त्यामुळे उपनगराध्यक्षपदी खान यांची बिनविरोध केल्याची घोषणा इंदुलकर यांनी केली तर स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी नगरपरिषदेवर शिवसेनेचे स्पष्ठ बहुमत असल्यामुळे शिवसेनेकडून योगेश चांडक व विनोद कुलथे यांचे दोन अर्ज दाखल झाले . दोन्ही स्वीकृतपदाचा अधिकार शिवसेनेला असल्यामुळे त्यांची ही निवड बिनविरोध करण्याची घोषणा इंदुलकर यांनी केली. नगरसेवक सुनिल रोकडे, मीना खातळे, उमेश कस्तुरे, उज्वला जगदाळे, आशा सोनवणे, गजानन कदम, सिमा जाधव युवराज भोंडवे, कीशोर बगाड, रोशनी परदेशी, आरती करपे, , रंगनाथ चौधरी, भाजपचे नगरसेवक अपर्णा धात्रक, गीता मेंगाळ, साबेरा पवार, दिनेश कोळेकर, अपक्ष नगरसेवक संपत डावखर आदी उपस्थित होते. दरम्यान सर्व नगरसेवकांना मुख्याधिकारी विजय कुमार मुंडे यांनी नगरसेवक निवडणुकीचे प्रमाण पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जंगी स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता,विश्वास व्यवहारे,योगेश मालपाणी,गणेश भराडे,रावसाहेब इंदुलकर,नाना इंदुलकर, प्रल्हाद जाधव ,शिवा परदेशी ,समीर यादव, रमेश खातळे ,राजू इंदुलकर,व्यापारी संघाचे कन्हयालाल बजाज,समिन खान,रामदास चौधरी ,रोहन कुलथे,किरण भुतडा,व्यंकटेश भागडे,संजय वारघडे,पुरूषोत्तम चांडक,संदीप शर्मा,प्रितम भुतडा,आकाश खारके,माधव आवसरकार,आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
इगतपुरीच्या उपनगराध्यक्षपदी नईम खान यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 4:31 PM