देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्टÑीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ हे एकदिवसीय राष्टÑीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्टÑ बटालियन एनसीसी नाशिक येथील कर्नल ए.के. सिंग यांच्या मार्गदशर्नाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर, उपप्राचार्य डॉ. ए. बी. पवार, डॉ. मालती आहेर तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. विजय जोशी उपस्थित होते. राष्टÑीय छात्र सेनेचे प्रमुख लेफ्टनंट बादल लाड यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की संपूर्ण भारतामध्ये हा कार्यक्रम दिनांक १ आॅगस्ट ते १५ आॅगस्टपर्यंत एनसीसीचे जवान ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ राबवले जात आहे. समाजमाध्यमांच्या साहाय्याने फेसबुक, व्हॉट्सअॅप, ब्लॉग लिहिणे, इन्स्टाग्राम यातून प्रचार-प्रसार तसेच जनजागृती केली जात आहे.
एनसीसीचे आत्मनिर्भर भारत अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 10:10 PM
देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्टÑीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ हे एकदिवसीय राष्टÑीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देएकदिवसीय राष्टÑीय वेबिनारचे आयोजन