राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांनी पळसे येथील महामार्गालगत असलेल्या विविध समस्यांबाबत टोल प्रशासनास निवेदन देऊन, त्या प्रलंबित समस्या पूर्ण करण्यासाठी अथवा योग्य कार्यवाहीसाठी ३० जूनपर्यंतचा कालावधी दिला होता. परंतु टोल नाका व्यवस्थापनाकडून प्रलंबित कामाला सुरुवात करण्यात न आल्याने सोमवारी सकाळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने टोल नाका कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, आकाश पिंगळे, अनिल पेखळे, पवन देशमुख, नंदू चव्हाण, कुमार गायधनी, अभिषेक गायखे, सोनू ठोंबरे, सोरव गायखे, ओम गायखे आदी उपोषणाला बसले होते. टोलनाका व्यवस्थापक नानक लुल्ला, वैद्य, हर्षल वाकचौरे, विठ्ठल पाटील, कडलग यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा करून सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.
पळसेेेे येथील महामार्गावरील हाय मास्टचे विद्युत कनेक्शन घेतले असून दोन दिवसात हाय मास्ट सुरू करण्यासोबत इतर समस्या देखील लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्याहस्ते उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले.
(फोटो ३१ एनसीपी)