देवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 01:05 IST2020-12-10T23:14:11+5:302020-12-11T01:05:02+5:30
देवळा: आगामी देवळा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

देवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक
देवळा: आगामी देवळा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पक्षनिरीक्षक व जि. प. सभापती डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील राममंदिरात बैठक घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष जगदीश पवार, जि.प. सदस्या नूतन आहेर, तालुकाध्यक्ष यशवंत सिरसाठ, प्रांतिक सदस्य योगेश आहेर, रायुकाँचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. पक्षनिरीक्षकांनी इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेतली. सयाजीराव गायकवाड, योगेश आहेर, पंडित निकम, सुनील आहेर, निखिल आहेर आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली जावी, अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली.
बैठकीस माजी जि.प. सदस्या उषा बच्छाव, वैशाली निकम, शरद आहेर, शहर अध्यक्ष दिलीप पाटील, चिंतामण आहेर, अतुल आहेर, अमोल आहेर, संतोष शिंदे, भाऊसाहेब आहेर, सतीश सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, बंडू आहेर, रजत आहेर, गणेश आहेर, किशोर खरोटे, भिला सोनवणे, तुषार मोरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.