Shivsena: NCP खासदाराची शिंदेंच्या मंत्रीमहोदयांसोबत बंद दाराआड चर्चा, अजित पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 11:02 AM2022-10-15T11:02:28+5:302022-10-15T11:03:06+5:30

राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) यांनीही शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे

NCP MP sunil tatkar's closed door discussion with Shinde's ministers Uday Samant, Ajit Pawar speaks candidly | Shivsena: NCP खासदाराची शिंदेंच्या मंत्रीमहोदयांसोबत बंद दाराआड चर्चा, अजित पवार स्पष्टच बोलले

Shivsena: NCP खासदाराची शिंदेंच्या मंत्रीमहोदयांसोबत बंद दाराआड चर्चा, अजित पवार स्पष्टच बोलले

Next

मुंबई - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. सुनील तटकरे यांचे पुतणे, माजी आमदार अवधूत तटकरे तसेच मीरा भाईंदरच्या तीन नगरसेवकांनी शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. बावनकुळे यांनी यावेळी, कोकणात ठाकरेंना लवकरच आणखी धक्के बसतील, असा दावा केला. त्यातच, दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर, राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, या भेटीवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली. 

राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) यांनीही शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. त्यामुळे, शिंदे गट आण भाजपत प्रवेशांची संख्या वाढत आहे. त्यातच, राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीत बंद दाराआड चर्चा झाली असून राजकीय वर्तुळात चर्चाही होत आहे. मात्र, या भेटीचा कोणतीही गैरअर्थ काढू नका, असे अजित पवार यांनी स्पष्टच शब्दात सांगितले. मालेगावला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यासभेत विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी तटकरे आणि सामंत यांच्या भेटीवर स्पष्टीकरण दिलं. 

'राजकीय जीवनामध्ये नेत्यांच्या भेटीगाठी घ्यावा लागत असतात, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली असेल. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असं कळलंय. पण, या भेटीबाबत गैर अर्थ काढून बोलू नका,' असे पत्रकारांना उद्देशून म्हटले. तसेच, तसेच, सध्या महाराष्ट्रात अवघड परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी संकटात आहे, वाढत्या महागाईने जनता तर बेरोजगारीमुळे तरुण पिढी त्रस्त आहे, अशी टीकाही पवार यांनी केली. 

Web Title: NCP MP sunil tatkar's closed door discussion with Shinde's ministers Uday Samant, Ajit Pawar speaks candidly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.