नाशिक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार, खासदार हे अयोध्येत श्रीरामचंद्रांच्या दर्शन आणि आरतीसाठी गेले आहेत त्यांची श्रद्धा रामावर आहे तर आमची श्रद्धा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यावर आहे असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी आज नाशिकमध्ये व्यक्त केलं.
आज माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. सध्या अवकाळी आणि अतिवृष्टी यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. द्राक्ष कांदा यांसह अन्य पिकांचे नुकसान झाले अशावेळी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा सरकार अयोध्येला गेले आहे ते योग्य नाही असे ते म्हणाले. दरम्यान उद्योगपती अदानी प्रकरणात जेपीसी चौकशी बद्दलही बोलताना त्यांनी पुनश्च आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला मात्र विरोधी पक्षांची एकच भूमिका असेल तर आपली ही संसदीय चौकशी समितीला संमती राहील असे ते म्हणाले.