दिंडोरी : दिंडोरी - पेठ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या दोन दिग्गज माजी आमदारांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवाराने सुटकेचा नि:श्वास सोडला असून, दिंडोरीत एकूण पाच उमेदवार रिंगणात असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवाळ व शिवसेनेचे भास्कर गावित यांच्यात सरळ काट्याची लढत रंगणार आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत युती - आघाडी तुटल्याने सर्व पक्षांचे उमेदवार होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपसह दहा उमेदवार रिंगणात होते; मात्र खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसमध्ये झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. यंदा राष्ट्रवादीला शिवसेनेचे आव्हान होते, मात्र शिवसेनेत इच्छुकांची मोठी भाऊगर्दी होती. त्यातच लोकसभेत राष्ट्रवादीकडून उमेदवारी केलेले धनराज महाले यांनी घरवापसी करत शिवसेनेची उमेदवारी मिळवली होती मात्र इच्छुक रामदास चारोस्कर व भास्कर गावित यांच्यासह संघटनेतील नाराजी नात्यानंतर उमेदवारी बदल करत भास्कर गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती यानंतर धनराज महाले व रामदास चारोस्कर यांनी अपक्ष अर्ज दाखल करत आपले आव्हान कायम ठेवले होते; मात्र अखेर त्यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे भास्कर गावित यांना काहीसा दिलासा मिळाला आहे त्यांना आता आमदार नरहरी झिरवाळ यांचा सरळ सामना करावा लागणार आहे.वंचित आघाडीचे अरुण गायकवाड यांचेही आव्हान राहणार आहे. दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी २६९२०५ मतदार होते, तर यावेळी ३०१४० मतदार वाढत एकूण २९९३४५ मतदार आहे.यात दिंडोरी तालुक्यात 216414 तर पेठ तालुक्यात 82931 मतदार आहे.रिंगणातील उमेदवारनरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस), भास्कर गावित (शिवसेना), अरु ण गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), टिकाराम बागुल (मनसे), जना वतार (बसपा)२०१४ मध्ये होते१० उमेदवार ।यंदा आहेत एकूण ५ उमेदवार
राष्टवादी-शिवसेनेतच दिंडोरीत खरी चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 1:18 AM