लोहोणेर : पेट्रोल डिझेल दरवाढ तसेच रासायनीक खताची किंमत दिड पट वाढविल्याचा राष्ट्रवादी युवक कँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येवून तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.आधीच कोविड १९ मध्ये मेटाकुटीला आलेल्या शेतकरी बांधवांपुढे येणाऱ्या काळात शेती करावी तरी कशी असा गहन प्रश्न निर्माण केला आहे. तसेच मोठ्या अपेक्षा डोळ्यापुढे ठेवून ३-४ वर्ष सतत यु.पी.एस. सी. परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा तारीख जाहीर करून अचानक रद्द केल्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक जिल्ह्याच्या वतीने तालुका पातळीवर सर्व कोविड १९ कायदेशिर नियमाचे पालन करून देवळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष सुनील आहेर यांच्या नेतृत्वाखाली देवळा पेट्रोल पंपावर उपस्थित नागरिकांना फुल देऊन व बसस्थानकासमोर सुफला या खताच्या गोणीचे पुजन करून इंधन व रासायनिक खतांच्या दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांच्या मार्गदर्शाखाली समता परिषदेचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस सुशांत गुंजाळ, उपाध्यक्ष धनंजय बोरसे, चिटणीस मुन्ना जाधव, रईस पटेल, मनोज गुजरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
इंधन, खतांच्या दरवाढीचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 8:44 PM
लोहोणेर : पेट्रोल डिझेल दरवाढ तसेच रासायनीक खताची किंमत दिड पट वाढविल्याचा राष्ट्रवादी युवक कँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येवून तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देखताच्या गोणीचे पुजन करून इंधन व रासायनिक खतांच्या दरवाढीचा निषेध करण्यात आला.