नाशिक : करवाढीबरोबरच शहरातील अन्य प्रश्नांवर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमावर बोट ठेवून सुरू केलेल्या कामकाजामुळे अडचणीत आलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राष्टÑवादी कॉँग्रेसने सोमवारी काढलेल्या हल्लाबोल मोर्चामुळे राजकीय बळ मिळाले असून, यापूर्वी आयुक्तांच्या विरोधात मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याचे पाहून राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ हेदेखील महापालिकेच्या कामकाजावर नाराज असल्याचे दर्शवून भाजपातील एक गट पुन्हा तयारीला लागला आहे.नाशिक महापालिकेत राष्टÑवादीचे नगण्य सदस्य असल्यामुळे त्यांच्या विरोध व समर्थनाचा फारसा विचार महापालिकेच्या राजकारणात आजवर करण्यात आलेला नाही, परंतु त्यांचा आयुक्त मुंढे यांच्या काही निर्णयांना विरोध असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले आहे. मात्र आता नाशिककरांच्या महापालिकेशी निगडित असलेल्या करवाढीसह अन्य प्रश्नांमध्ये खुद्द छगन भुजबळ यांनीच लक्ष घातल्याचे सोमवारच्या मोर्चातून उघड झालेआहे. भुजबळ यांनी अडीच ते तीन किलोमीटर पायपीट करून मोर्चात दाखविलेली सक्रियता पाहता, त्याची गांभीर्याने दखल सत्ताधारी भाजपाने घेतली आहे.भुजबळ यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच महापालिकेला कामकाज सुधारण्याचा सल्ला देतानाच जोपर्यंत जनसामान्यांचे प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत संघर्ष करण्याचा इशारा दिला आहे. भुजबळ यांच्या आक्रमकराजकारणाशी भाजपा चांगलेच परिचित असल्यामुळे राष्टÑवादीच्या या मोर्चामुळे नाशिककरांची पुन्हा राष्ट्रवादीला सहानुभूती मिळू शकते अशी भीती दाखविण्यास भाजपाचे स्थानिक नेते, पदाधिकारी आता पक्षश्रेष्ठींना मोकळे झाले आहेत. भाजपाने करवाढ रद्द करण्यासाठी विशेष महासभेत निर्णय घेवूनही आयुक्त मुंढे बधले नाही, शिवाय मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे वेळोवेळी तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने नैराश्येत आलेल्या भाजपाला राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाने बळ मिळाले आहे.सरसकट तोडगा काढण्याचा रेटाकरवाढीच्या विरोधात राजकीय पक्ष म्हणून राष्टÑवादी कॉँग्रेसनेच मोर्चाच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेतल्याने त्याची शासनपातळीवरून दखल घेणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे शहरात भाजपाविरोधी वातावरण तयार होण्यापूर्वीच पक्षश्रेष्ठींनी आयुक्त मुंढे यांच्याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा अथवा करवाढीसह अन्य मुद्द्यांवर सरसकट तोडगा काढावा, अशी मागणी रेटण्यासाठी एक गट तयारी करू लागला आहे.
राष्ट्रवादीच्या मोर्चाने भाजपाला बळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:10 AM
करवाढीबरोबरच शहरातील अन्य प्रश्नांवर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमावर बोट ठेवून सुरू केलेल्या कामकाजामुळे अडचणीत आलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राष्टÑवादी कॉँग्रेसने सोमवारी काढलेल्या हल्लाबोल मोर्चामुळे राजकीय बळ मिळाले असून, यापूर्वी आयुक्तांच्या विरोधात मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याचे पाहून राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ हेदेखील महापालिकेच्या कामकाजावर नाराज असल्याचे दर्शवून भाजपातील एक गट पुन्हा तयारीला लागला आहे.
ठळक मुद्देआयुक्तांविरोधात धार राजकीय लाभ उठविण्याची तयारी