ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला. सरपंच पदासाठी शीला सतीश कोकाटे व उपसरपंच पदासाठी आशा रवींद्र ठोक या उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यामुळे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक बिनविरोध पार पडली. युवा नेते सतीश कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे समर्थक गटाने ७ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे निवडणुकीची औपचारिकता बाकी होती. यावेळी बैठकीस रंगनाथ कोकाटे, शरद कोकाटे हे सदस्य हजर होते तर छाया अनिल ठोक या सदस्य अनुपस्थित राहिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक कटारे व ग्रामसेवक सुनील तुपे यांच्या उपस्थितीत कामकाज पार पडले. यावेळी सतीश कोकाटे, लक्ष्मण कोकाटे, सतीश सोमनाथ कोकाटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - ०२ खडांगळी सरपंच
सिन्नर तालुक्यातील खडांगळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शीला सतीश कोकाटे तर उपसरपंचपदी आशा रवींद्र ठोक यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकारी.
===Photopath===
020321\02nsk_30_02032021_13.jpg
===Caption===
फोटो - ०२ खडांगळी सरपंच सिन्नर तालुक्यातील खडांगळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शीला सतिष कोकाटे तर उपसरपंचपदी आशा रवींद्र ठोक यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकारी.