पंचवटी : राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहर व जिल्हा कमिटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या उपस्थितीत शुक्र वारी (दि. २५) मुंबई नाका येथील पेट्रोलपंपावर इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करून मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. गेल्या आठवड्यापासून रोज पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत आहे. ही दरवाढ सामान्य जनतेच्या खिशाला परवडणारी नाही. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने रोजच इंधन दरवाढ करण्याचा सपाटा लावला आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत इंधनाचे दर जास्त आहेत. नाशिकमध्ये पेट्रोल ८६.०१ रुपये, तर डिझेल ७२.४५ रुपये प्रतिलिटर या दराने मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असून, कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे. या सर्व बाबींचा निषेध म्हणून शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँगे्रसच्या वतीने मोदी सरकारविरोधात निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी कोते पाटील, विशाल काळभोर, जिल्हाध्यक्ष पुरु षोत्तम कडलग, शहराध्यक्ष अंबादास खैरे, अॅड. चिन्मय गाढे, वैभव देवरे, रोहन नहिरे, अमोल नाईक, कैलास मोरे, शिवराज ओबेरॉय, सिद्धांत काळे, किरण पानकर, राहुल पाठक, डॉ. संदीप चव्हाण, किरण मानके, सुनील घुगे, घनश्याम हिरे, भूषण शिंदे, वैभव गाजरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादीकडून इंधन दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:19 AM