नाशिक- पेठ नगरपंचायतीच्या दुसऱ्या ईनिंगमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस, माकपा, भाजप व अपक्ष यांच्या महाआघाडीने आपली सत्ता स्थापन केली असून राष्ट्रवादी कॉग्रेसचे करण करवंदे यांची नगराध्यक्षपदी तर माकपाच्या अफ्रोजा शेख यांची उपनगराध्यक्षपदावर वर्णी लागली आहे.
नगरपंचायत कार्यालयात मंगळवारी ( दि.15 ) रोजी निवडणूक पिठासन अधिकारी तथा दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया राबवण्यात आली. नगरध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते. 17 सदस्यांपैकी राष्ट्रवादी कॉग्रेसचे करण करवंदे यांना 13 तर शिवसेनेचे मनोज घोंगे यांना 4 मते मिळाल्याने करण करवंदे यांची नगराध्यक्षपदी निवड घोषीत करण्यात आली.
उपनगराध्यक्ष पदासाठी माकपाच्या अफ्रोजा शेख यांना 13 मते मिळाली तर शिवसेनेचे प्रकाश धुळे यांना 4 मते मिळाल्याने माकपाच्या अफ्रोजा शेख यांची उपनगराध्यक्षपदी निवड घोषीत करण्यात आली. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीनंतर विजेत्या गटाकडून जल्लेष साजरा करण्यात आला. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पूत्र गोकूळ झिरवाळ, कॉ. जे.पी. गावीत यांचे पूत्र इंद्रजित गावीत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, युवक तालुकाध्यक्ष गिरीश गावीत, जिल्हा बँक संचालक नामदेव हलकंदर, रामदास गवळी, हिरामण पवार, कांतीलाल राऊत,माकपाचे नामदेव मोहांडकर, राजू शेख, जाकीर मानियार, समीर राजे, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष विशाल जाधव, नवनिर्वाचित नगराध्यक्ष रामदास गायकवाड, युवराज लिमले, छाया हलकंदर, विजय धूम, गौरव गावीत, रामेश्वरी व्यवहारे, लता गायकवाड, सरिता हाडळ, हेमलता वळवी, राहुल चोथवे, अलका कस्तूरे यांचे सह राष्ट्रवादी, माकपाचे पदाधिकारी उपस्थित होते.