देशात इंधनाच्या किमती झपाट्याने वाढत असून, पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. कोरोनामुळे संचारबंदी असताना सर्वसामान्य जनतेचे आर्थिक हाल होत आहे. अशात केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या विचार न करता सततची इंधनदरवाढ करून तुघलकी निर्णय घेत आहे. यात सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आहे. कोरोना काळात रुग्णांना बेड उपलब्ध होत नसून रुग्णवाहिकेत इंधन टाकणे सुद्धा परवडणारे नाही. यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी रुग्णवाहिकेला धक्का देत उपहासात्मक आंदोलन केले. तसेच पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झाल्या पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात संदीप खैरे, संदीप गांगुर्डे, संतोष जगताप, अक्षय पालदे, रोहित जाधव, राज रंधवा, जॉनी सोळंकी,राम शिंदे आदी उपस्थित होते. (फोटो १८ एनसीपी)
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे ‘धक्कामार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:14 AM