सरपंचपदासाठी सुभाष राऊत यांच्या नामनिर्देशन अर्जावर सूचक ग्रामपंचायत सदस्य किरण आहिरे, तर उपसरपंचपदाच्या ताराचंद चौधरी यांच्या नामनिर्देशन अर्जावर सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्या नंदाबाई भोये यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी जे. के. गोवर्धने यांनी निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांची सभा घेऊन सरपंचपदी सुभाष राऊत व उपसरपंचपदी ताराचंद चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
निवडीप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य किरण आहिरे दीपाली गांगुर्डे ,नंदाबाई भोये माधुरी राऊत, सुलोचना कानडे, प्रकाश राऊत, सौ.मंगला महाले ग्रामपंचायत सभागृहात उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक पी.सी.महाजन यांनी गावाच्या विकासासाठी सर्व गावकरी व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांनी आपापसांतील मतभेद दूर ठेवून गावाच्या विकासासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - १७ नांदुरी
नांदुरीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे सुभाष राऊत, तर उपसरपंचपदी ताराचंद चौधरी यांच्या बिनविरोध निवडीप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी जे. के. गोवर्धन यांच्यासह ग्रामस्थ.
===Photopath===
170221\17nsk_15_17022021_13.jpg
===Caption===
फोटो - १७ नांदुरी नांदुरीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे सुभाष राऊत तर उपसरपंचपदी ताराचंद चौधरी यांच्या बिनविरोध निवडीप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी जे के गोवर्धनसह नांदुरीचे ग्रामस्थ.