नाशिक : शिक्षण घेण्यासाठी अनेक नवीन संधी आणि मार्ग उपलब्ध होत असून, शिक्षण पद्धतींमध्ये झालेल्या बदलांप्रमाणे डिस्टन्स एज्युकेशन म्हणजेच दूरस्थ शिक्षण हा एक नवीन मार्ग नोकरी व उद्योगधंदा करणाऱ्या नागरिकांना उपलब्ध झाला आहे. मूलभूत शिक्षणानंतर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाºयांसाठी डिस्टन्स एज्युकेशन्सचा पर्याय आॅनलाइनच्या माध्यमातून आणखी जवळ आला असून, जगभरातील विविध नामांकित संस्थांचे शिक्षण विद्यार्थ्यांना घेणे शक्य झाले आहे.राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वेगवेगळ्या विद्यापीठांचाही यात समावेश आहे. शिवाय सहज उपलब्ध होणारे अर्थसाहाय्य शिक्षणाची गंगा प्रवाही करण्यात आणखीनच मदत करीत आहे. उच्चशिक्षणापासून ते अगदी स्थानिक पातळीवरील शिक्षणापर्यंत डिस्टन्स एज्युकेशनचा पर्याय उपलब्ध आहे. शालेय शिक्षणापासून याची सुरुवात होत असून, दहावी अथवा बारावी नापास झालेल्यांना १७ नंबरचा फॉर्म भरूनही परीक्षा देता येत आहे. पुढील शिक्षणासाठी प्रौढ शिक्षणाचाही डिस्टन्स एज्युकेशनमध्ये समावेश आहे. आॅनलाइन प्रणालीमुळे या दूरस्थ शिक्षण वर्गांना प्रवेश मिळविणे तसेच अभ्यास साहित्य व मार्गदर्शन प्राप्त करणे करणे अधिक सोपे झाले असून, आता प्रमाणपत्रही आॅनलाइन मिळू लागल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांपासून दूर राहून आपली नोकरी व कामधंदा सांभाळून आपल्या आवडीच्या क्षेत्राचे शिक्षण घेणे शक्य झाले आहे.नाशिकमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे राज्यभरात एकूण ६ लाख ३५ हजार विद्यार्थी सध्या अशाप्रकारे शिक्षण घेत असून, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या नाशिक केंद्रातूनही सुमारे एक हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
आॅनलाइन प्रणालीमुळे दूरस्थ शिक्षण आले जवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:40 AM
शिक्षण घेण्यासाठी अनेक नवीन संधी आणि मार्ग उपलब्ध होत असून, शिक्षण पद्धतींमध्ये झालेल्या बदलांप्रमाणे डिस्टन्स एज्युकेशन म्हणजेच दूरस्थ शिक्षण हा एक नवीन मार्ग नोकरी व उद्योगधंदा करणाऱ्या नागरिकांना उपलब्ध झाला आहे.
ठळक मुद्देअर्थसाहाय्य उपलब्ध : नोकरी, व्यवसाय करताना शिक्षण घेणे सुलभ