एनटीएतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेतली जाणारी यावर्षी नीट परीक्षा इंग्रजी आणि हिंदीसह तब्बल ११ भाषांमध्ये घेतली जाणारी ही नीट परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत. देशभरातील विविध शहरांतील केंद्रांवर नीट परीक्षा होणार असून या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी प्रविष्ठ होणार असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जाणार असून लवकरच एनटीएतर्फे मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या जातील. या परीक्षेसाठी १५ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करता येईल. वैद्यकीय अभ्यासक्रमातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्तरीत्या नीट परीक्षा होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे अखिल भारतीय स्तरावरील महत्त्वाच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनामुळे यंदा सर्वच सीईटी परीक्षा विलंबाने होत आहेत.
१ ऑगस्टला ‘नीट’ परीक्षा ; ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:14 AM